Lek Ladki Yojana Apply लाडकी बहीण नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महिलांना मोठ गिफ्ट मिळणार

Lek Ladki Yojana Apply महिला सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ सारख्या अनेक योजना सुरू केल्या. ‘मुद्रा योजने’च्या लाभार्थ्यांमध्ये 60 टक्के महिला आहेत. यामुळे लाखो महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत झाली आहे. ‘लखपती दीदी’ योजनेअंतर्गत महाराष्ट्रात गेल्या वर्षी 25 लाख महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे उद्दिष्ट साध्य झाले आणि यावर्षीही 25 लाख महिलांना तर राज्यात एकूण एक कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच महिलांना दिलेल्या कर्जाची परतफेड शंभर टक्के होते, असा अनुभव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितला.

मात्र, काही लोकांनी या योजनेचा दुरुपयोगही केला. काही इतके हुशार भाऊ निघाले की, त्यांनी बहिणीच्या नावानेच अर्ज केले आणि पैसे घेणे सुरू केलं. काही तर इतके हुशार निघाले की, ज्यांनी लाभ मिळावा पण फोटो लावला तर लक्षात येईल की आपण पुरुष आहोत म्हणून त्यांनी मोटरसायकलचा फोटो लावला. पण अशांना आपण हुडकून काढलं आहे आणि त्यांचे पैसे थांबवले आहेत. पण यामध्ये एखाद्या बहिणीचे चूक झाली असेल तर तिचे पैसे थांबवू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत. यातील प्रत्येकाची पडताळणी करा आणि त्यातील कोणी जेन्युएन निघाले तर त्यांना पुन्हा लाभ देणे शुरू करा. कुठल्याही पात्र बहिणीला आपल्याला वंचित ठेवायचं नाहीये. पण बहिणींच्या नावावर कोणी घुसखोरी करत आहे त्या घुसखोरांना आपल्यालाला त्या योजनेतून बाहेर काढायचं आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात आपण अनेक योजना सुरू केल्या. त्यापैकी एक म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना 1500 रुपये महिन्याला देणं सुरू केलं. अनेकांना वाटायचं की, निवडणुकीपूरतं हे भाऊ पैसे देणार आहेत आणि निवडणूक झाली की, सावत्र भावासारखे पैसे बंद करणार आहेत. पण हे सर्व विरोधकांनी एक वावटळ तयार केलं होतं ते बाजुला झालं. आपण निवडणुकीनंतर सुद्धा ही योजना सुरू ठेवली. पुढचे पाचही वर्षे ही योजना राहणार आहे. इतकेच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीतही आम्ही वाढ करणार आहोत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Comment