लाडक्या बहिणींना सरकारचे एक मोठे गिफ्ट मिळणार Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आता त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेने मुंबईतील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, कारण त्यांना थेट आर्थिक पाठबळ मिळणार आहे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि उद्देश

या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना केवळ आर्थिक मदत देणे एवढाच नाही, तर त्यांना उद्योजिका म्हणून उभे करणे हा आहे.

या निर्णयामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेतून मिळणारे पैसे बाजारात येतील आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

कर्जासाठी अर्ज आणि पात्रता

व्याजाचा परतावा: हे कर्ज देण्यासाठी सरकार विविध महामंडळांच्या योजनांचा आधार घेणार आहे. यात पर्यटन महामंडळाची ‘आई’ योजना, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आणि ओबीसी महामंडळ यांसारख्या ४ महामंडळांचा समावेश आहे. या महामंडळांच्या माध्यमातून १२% पर्यंत व्याजाचा परतावा दिला जातो.

लाभार्थी महिला: मुंबई बँकेकडून कर्ज घेणाऱ्या महिला जर या महामंडळाच्या लाभार्थी असतील, तर त्यांना या योजनेचा मोठा फायदा होईल.

Ladki Bahin Yojana अर्जाची प्रक्रिया: सध्या तरी या कर्जासाठी अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया जाहीर झालेली नाही. मुंबई बँकेकडून कर्जपुरवठा केला जाणार असल्याने संबंधित बँकेशी किंवा महामंडळांशी संपर्क साधावा लागेल.हा निर्णय मुंबईतील सुमारे १२ ते १५ लाख महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी मोठी संधी देणारा ठरू शकतो.

Leave a Comment