Gold Silver Price : सणासुदीचा काळ जवळ आल्याने सोन्या-चांदीच्या खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज, ८ सप्टेंबर रोजी सोन्याच्या आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे देशांतर्गत वायदा बाजारात (MCX) सोन्याचे दर विक्रमी उच्चांकावरून खाली आले आहेत.
सोन्याच्या दरातील मोठी घसरणः
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव ₹१,०७,१२२ प्रति १० ग्रॅमवर आला, जो शुक्रवारच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा ₹६०६ ने कमी आहे. याआधी शुक्रवारी सोन्याने ₹१,०७,८०७ प्रति १० ग्रॅमचा विक्रमी उच्चांक गाठला होता. डिसेंबर डिलिव्हरीसाठीही सोन्याच्या दरात ₹६१२ ची घसरण झाली.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
चांदीही झाली स्वस्तः
गेल्या आठवड्यात नवा उच्चांक गाठलेल्या चांदीच्या दरातही मोठी घसरण दिसून आली. डिसेंबर डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव ₹९७७ने घसरून ₹१,२३,७२० प्रति किलो झाला. ३ सप्टेंबर रोजी चांदीने ₹१,२६,३०० प्रति किलोचा विक्रमी उच्चांक गाठला होता.
IBJA नुसार नवे दरः
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, आज ९९९ शुद्ध सोन्याचा भाव ₹१०७,३१२ प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे, तर चांदीचा भाव ₹१२३,३६८ प्रति किलो झाला आहे.
एकंदरीत, सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या घसरणीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.