गेल्या काही वर्षांपासून, पीक नुकसानभरपाईच्या मंजूर झालेल्या रकमा वेळेवर बँक खात्यात जमा न होणे, ही एक मोठी समस्या बनलेली आहेत. अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मंजूर झाल्याचे कळते, पण महिनोनमहिने वाट पाहिल्यानंतरही पैसे खात्यात जमा होत नाही. यामागे नेमकी काय कारणे आहेत आणि यावर उपाय काय, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
नेमकी समस्या काय आहे?
पीक विमा कंपन्या आणि शासनामध्ये समन्वय नसल्याने या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. मागील खरीप आणि रब्बी हंगामात लाखो शेतकऱ्यांची नुकसानभरपाई मंजूर झाली, पण त्यातील मोठ्या संख्येने शेतकरी अजूनही पैशांच्या प्रतीक्षेत आहेत. उदाहरणार्थ:
मागील खरीप हंगाम: सुमारे ८८ हजार शेतकऱ्यांसाठी १०४ कोटी रुपये मंजूर झाले, पण त्यापैकी फक्त ६५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ८९ कोटी रुपये जमा झाले.
रब्बी हंगाम: १८,५०० शेतकऱ्यांसाठी २२ कोटी रुपये मंजूर असताना, फक्त १६,६८१ शेतकऱ्यांच्या खात्यात १८.८२ कोटी रुपये जमा झाल्याचे सांगण्यात आले आहे.
याचाच अर्थ, सरकारकडून पैसे मिळाल्यानंतरही विमा कंपन्यांकडून पैसे वाटप करण्यात दिरंगाई होत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
शेतकऱ्यांचा संताप का वाढतोय?
शेतकरी वेळेवर विमा हप्ता भरतात, पण त्यांनाच नुकसान झाल्यावर भरपाईसाठी प्रतीक्षा करावी लागते. मागील वर्षाच्या खरीप हंगामाचे पैसे अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत, आणि आता नवीन खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. यामुळे बियाणे, खते आणि इतर खर्चासाठी शेतकऱ्यांना पैसा उपलब्ध होत नाही. विमा कंपन्यांकडून होणाऱ्या या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांचा संताप वाढत आहे.
यावर उपाय काय?
जर तुमची पीक विम्याची रक्कम मंजूर झाली असेल, पण खात्यात जमा झाली नसेल, तर तुम्ही खालील गोष्टी करू शकता:
पेमेंट स्टेटस तपासा: तुम्ही PFMS (Public Financial Management System) पोर्टलवर जाऊन तुमच्या पेमेंटचे स्टेटस ऑनलाइन तपासू शकता.
जिल्हा कृषी कार्यालयात संपर्क साधा: तुमच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील कृषी कार्यालयात जाऊन तुमच्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घ्या.
बँक खात्याची तपासणी: तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी जोडलेले आहे की नाही, तसेच तुमच्या खात्याचे डिटेल्स योग्य आहेत की नाही, याची खात्री करा.
या समस्यांवर तात्काळ तोडगा काढणे आवश्यक आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही.