Bank Account : एक व्यक्ती किती बँक खाते ठेवू शकतो RBI चे नवीन नियम लागू

Bank Account : आजच्या काळात प्रत्येकाचे बँक खाते असतेच. कधीकधी लोकांकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतात. आजकाल युपीआयचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे बँक खाते असणे तर अत्यंत आवश्यक असते. याशिवाय सरकारच्या अनेक योजनांचा निधी थेट बँक खात्यातच जमा होतो. परंतू अशा अनेक कारणांमुळे तुमचे एका पेक्षा जास्त खाते असतील तर तुम्ही कधी विचार केलाय का की आरबीआयने एका व्यक्तीला जास्तीत जास्त किती बँकांमध्ये खाते उघडण्याची परवानगी असते? त्यामुळे तुम्ही किती बँक खाती ठेवू शकतात. याबाबत माहिती घेऊ.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

बँकेत विविध खाते उघडण्याची सुविधा

बँकेच्या वतीने ग्राहकांना अनेक प्रकारची खाती उघडण्याची सुविधा दिली जाते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार पगार खाते, चालू खाते, बचत खाते किंवा संयुक्त खाते उघडू शकता. बहुतेक ग्राहक बचत खाते उघडतात. या खात्यावर तुम्हाला व्याजाचा लाभही मिळतो. हे मूळ बँक खाते असते.

बचत आणि चालू खाते

ज्या व्यक्ती किंवा संस्था व्यवसाय करतात किंवा ज्यांचे व्यवहार खूप जास्त आहेत. ते चालू खाते उघडू शकतात. याशिवाय, पगार खाते देखील शून्य शिल्लक खाते आहे. पगार दर महिन्याला जमा होतो, त्यामुळे शिल्लक ठेवण्याची गरज नसते.

Leave a Comment