Karj mafi नमस्कार शेतकरी मित्रांनो विधानसभा निवडणुकीआधी महायुतीने शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. पण महायुतीचं सरकार येऊन आता सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीही कर्जमाफी झालेली नाही. त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने सरकारवर टीका केली जात आहे. या दरम्यान आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान समोर आलं आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
राज्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीची चर्चा आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जात आहे. कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांकडून सरकारला सातत्याने घेरलं जात आहे. माजी आमदार बच्चू कडू यांच्याकडून विविध शहरांमध्ये मोर्चा काढला जातोय. राज्य विधीमंडळाचं नुकतंच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. कर्जमाफी कधी करणार? असा जाब विरोधकांनी सरकारला विचारला होता. त्याला उत्तर देताना सरकारने कर्जमाफी करावी का आणि ती कशी करावी? याबाबतचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली असल्याची माहिती सरकारने दिली होती. ही समिती कर्जमाफीबाबत सरकारला अहवाल देईल, त्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं सरकारने म्हटलं होतं. यानंतर आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात घोषणा केली की, महाराष्ट्रातल्या अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ज्यांना खरी कर्जमाफीची गरज आहे. म्हणून ती कर्जमाफी कशी असावी? एखादा व्यक्ती शेतात बंगला बांधतो, फार्म हाऊस बांधतो, तो कर्ज उचलतो. त्याला कशाला शेतकऱ्यांची कर्जमाफी पाहिजे?”, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
Karj mafi “ज्या गरीब माणसाच्या शेतात काहीच पिकत नाही. ज्याने कर्ज उचललं आहे, जो आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलायला निघाला आहे, अशा व्यक्तीगत सर्वेक्षण करुन कर्जमाफी केली पाहिजे याकरता आपण पुढे काम करण्याचा प्रयत्न करतोय”, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.